Thursday, 3 November 2016

प्रेम माणसाला बदलून टाकत 
हसवत, रडवत, शिकवत, दुखवत 
मनाचा अंतर्भाग ढवळून काढत 
स्वतःचा परत शोध घ्यायला लावत 

प्रेम झंझावातासारखं येत तर कधी 
हलकेच फुलत रुजत जात
प्रेम माणसाला खर तर माणूस बनवत
प्रेम माणसाला जगायला शिकवत  
 
न दिसलेलं दिसू लागत 
न कळलेलं कळू लागत  
जे अटळ तेही मन स्वीकारू लागत
अन तरीही प्रेमाचं झाड मोहरत जात 

द्वेष अवहेलना मत्सर अन दुर्दैव 
असेच भरपूर पावलोपावली असतातच 
प्रेम त्यातून चांगलं बघायला शिकवत 
हसून समोरच फुल बघायला शिकवत 

प्रेम म्हणजे नाहीत फक्त तारे वारे 
नाही फक्त चंद्र मिलन हुरहूर अश्रू
नाही फक्त नाईलाजाने चाललेली पावले 
नाही फक्त निभावून नेलेली नाती 

प्रेम म्हणजे रसरसते चैतन्य 
प्रेम म्हणजे सावळी संध्या 
प्रेम म्हणजे मायेची दुलई 
प्रेम म्हणजे दाट दुधावरची साय 
   
प्रेम म्हणजे माणूस ओळखणं 
प्रेम म्हणजे माणूस समजणं 
प्रेम असते खरी माया 
काय दिल अन काय घेतलं यापलीकडे 
सदैव दुसऱ्यासाठी तेवत असलेली मैत्राची 
जाणीव म्हणजे असावे खरे प्रेम 

हरीश 

No comments:

Post a Comment