Thursday, 3 November 2016

तुझा अबोल गोडवा माझ्या गात्र गात्रातून भिनलेला
पानगळीची चाहूल लागताना अवचित कासावीस होणारा
कधी सीमा ओलांडणारा कधी कोंदणात अडकणारा
तुझा अबोल गोडवा
माझ्या गात्रा गात्रातून रुजलेला 
तुझ्या डोळ्यातले गर्द सावलीसारखे प्रेम 
तुझ्या डोळ्यातला पुनवेचा चंद्र 
निळ्याशार आभाळाखाली मनावर हलकेच पांघरूण घालून शांतवणारा 
तुझा अबोल गोडवा ,उत्तर नसलेले प्रश्न अन मौनाची प्रदीर्घ भाषा 
अन तरीही त्यातून होणारी संभाषणे अन सांत्वन 
शब्दांपलीकडे असूनही जगवणारा तुझा अबोल गोडवा 
माझ्या गात्रागात्रातून रुजलेला 
तुझ्या न फुललेल्या स्वप्नांना जपून ठेवलेल्या
माझ्या मनाच्या त्या हळव्या कप्प्याएवढाच सच्चा
तुझा अबोल गोडवा।।।
हरीश

No comments:

Post a Comment