Thursday, 3 November 2016

दुसऱ्याच मन वाचता येत नसलं 
तरी आपल्या मनातलं बोलायला कोणी तरी हवं असत 
आवडेल ना आवडेल पटेल ना पटेल पण ऐकून घेणार 
कोणीतरी हवं असत 

दरवेळी आपले दुखरे घाव 
जवळच्या माणसाला दाखवून उपयोग नसतो 
कधीकधी ते घाव बघून उलट आयुष्याला नात्यांनी 
जोडलेली माणसे हबकून जातात 
त्यांच्या आपल्यातले वास्तवाचे निखारे कधी अधिक दाहक होतात 

म्हणून वाटेल ते बोलायला अन तरीही न तुटायला 
कोणत्याही वयात एखाद मोरपंखी नातं हवं असत 
आपलं  नसलेलं अन तरीही आपल्याला कवेत घेणार 
एक आकाश हवं असत 

वेड्या स्वप्नांना न हसणार अन चुकीच्या पावलांना 
आर्जवाने, प्रसंगी दटावून वेळीच रोखणार एक मैत्र हवं असत 
नातं नसलेलं अन तरीही नाती उलगडणारं 
स्वप्नाळूपण अन कठोर सत्य यांचे धागेदोरे जुळवून 
सोबत असणार कोणी हवं असत 

मनुष्यजन्माच्या अगम्य फेऱ्यांना समोर जाताना 
कायम हसरं राहण्याची उर्मी देणार कोणी हवं असत 
असं कोणी जस हवं असत तास आपणही कुणासाठी 
असायला पाहिजे असतो 
एका दिव्याने दिवा पेटवतच रस्ता तयार करायचा असतो 

हरीश 

No comments:

Post a Comment