सहवासाची चांदणफुले
उधळत गेली मनात खोल
अंकुरलेले हिरवे काही
हळवे त्याचे अनवट बोल
नाती सगळी असली तरीही
नाते नवीन जडते नकळत
आयुष्याच्या वाटेवरती
फिरून उमटती नवीन रंग
आभासांची सुंदर नक्षी
हृदयातली ती अनाम हुरहूर
शब्दांच्याही पलीकडे जे
स्पर्शून जाते हळूच अनावर
हरीश
No comments:
Post a Comment