सर अशी पावसाची आसमंतात पसरते
सर्वत्र चैतन्याचे झरे स्त्रवू लागतात
तसे मन हे जास्त जास्त गिरक्या घेऊ लागते
बरचस कल्पनेतलं थोडस सत्यातल काहीस मनातलं
किनारा सोडू लागत
थेम्ब टपोरे होतात तसे डोळे धूसर होतात
हिरव्या आसमंतात फिरताना धुक्यासारखे पाणावतात
एक एक हिरवं पान मनाला खुणावत
अन घरट्यात चिंब भिजलेलं पाखरू अलगद मनातही उतरत
अशा रेशमी वेळा जगता आल्या का .. एक मन विचारत
अर्थातच त्याशिवाय का आता येथून हलू नयेस वाटतंय
पाण्यामध्ये भिजून विरघळलेले सल अजूनही हसतात स्वतःशी
आसासून जगलेले क्षण आजही दिलदारपणे हसतात
पोळत भिजत काकडत गोठत जगणं तर इथवर आलंच आहे
एक एक धडा शिकताना मनही आता तर पूर्ण बदललंय
नेहमीच सगळ्या आशा अन स्वप्न पूर्ण झाल्या नसल्या
तरी सगळ्या सगळ्या भावनांचा गोफ खराखोटा खेळून झालाय
तो तुडुंब भरलेला ढग अन त्याभोवती नक्षीसारखी चमकणारी वीज
अन त्या मुग्ध सावळ प्रकाशात अजूनही भिजू शकणारा वर्तमान
आजही त्यासाठी उगवणारे कोवळे हिरवे अंकुर अन ओठावर येणार गाणं
कुणाचा आकंठ मायेत भिजलेला स्पर्श अन जवळ घेणारी नजर
फक्त पाऊसच देऊ शकतो .........
हरीश
No comments:
Post a Comment