कधीकधी मला तुझा नुसताच आवाज ऐकावासा वाटतो
कधीकधी मला तुझा फोटो बघावासा वाटतो
कधीकधी मला नुसतीच स्वप्ने पहायची असतात
तुला घेऊन पुस्तक वाचायचं असत
सुंदर गाण ऐकायचं असत
तुझा हात स्पर्शायचा असतो
पारिजातकाची शुभ्र नाजूक फुल तुझ्यावर
उधळायची असतात
हिरव्यागार वाटेवर पक्ष्यांची किलबिल ऐकत
निशब्द चालायचे असते
कधीकधी मला तुझ्या कुशीत झोकून द्यायचं असत
छोटे-मोठे न संपलेले टोचते सल संपवायचे असतात
कधीकधी मला तुला मग्न कामात बघायचे असते
तुझी लगबग ,एका बाजूला पूर्ण होत जाणारी काम
एका बाजूला सांभाळलेली इतर चपखल व्यवधान बघून
तुझे कौतुक करायचे असते
कधीकधी मला असे वाटत रहाते
की तुलासुद्धा माझ्यासाठी कधी अस वाटत असेल का
आकाशात उडणारा पांढराशुभ्र पक्षी पाहून
माझ्या आठवणीने काळजाचा एखादा ठोका चुकत असेल का ?
हरीश
No comments:
Post a Comment