एका माझ्या वाढदिवसाला अचानक तिने फोन केला
अनेक वर्षांनी तिचा आवाज कानावर पडला
आश्चर्य आनंद संभ्रम अशा भावना एकत्र आल्या
ती म्हणाली, वाढदिवसाच्या शुभेछया
आणि हा ,हा थांब जरासा
इतके दिवस कुठे अन काय असं विचारू नकोस आता
आता या क्षणी फक्त हाच क्षण जग ना जरासा
सर्व काही नवं सर्व काही वेगळं जस ,
तुला आवडायचा तसा कोऱ्या पुस्तकाच्या पानांचा वास
तसंच हे नवीन कोर तुझं स्वतःच वर्ष
तुझ्या जंन्मतारखेपासून सुरु होऊन
३६५ दिवसांच्या आवर्तांत भिरभिरून परत आलेलं
त्याची सुरवात आनंदाने होवो अन
तो आनंद पुढचे ३६४ दिवस टिकून तू
परत नवीन वर्ष बघो
फोनवर तुला गिफ्ट द्यायची आहे
असं म्हणून तू एक सुरेख कविता ऐकवली
एका आईची अन मुलीची
कवितेतली आई कवितेतल्या मुलीला
सांगते की तू मुक्त आहेस अन तेच माझे स्वप्न आहे
तुझ्या हसऱ्या डोळ्यातील नजरेने मला परत जगायचे आहे
आणखीन काही बोलण्याआधी ती म्हणाली
बघ सांग मला सावकाश माझी गिफ्ट आवडली का
अन परत कोणताही धागादोरा न ठेवता
ती परत लुप्त होऊन गेली !
हरीश
No comments:
Post a Comment